December 1, 2023

Warning: sprintf(): Too few arguments in /home/productt/taranganews.com/wp-content/themes/chromenews/lib/breadcrumb-trail/inc/breadcrumbs.php on line 253
Belly Fat Reduce After 40 Age Weight Loss Easy Tips By Dietician; ४० व्या वर्षानंतर बेली फॅट कमी करण्यासाठी वापरा या पद्धती, हमखास येईल वजन झर्रकन खाली


Ways To Lower Belly Fat In Your 40s: अनेकदा बाकी शरीर बारीक असतं मात्र पोट फुगलेले दिसतं. यामुळे संपूर्ण शरीराचा लुक खराब होतो आणि कोणत्याही प्रकारची फॅशन वा स्टाईल करता येत नाही. साधारण ४० व्या वर्षानंतर वजन कमी करणे अथवा बेली फॅट कमी करणे आव्हानात्मक ठरते.

४० व्या वर्षानंतर बेली फॅट कमी करण्यासाठी वापरा या पद्धती, हमखास येईल वजन झर्रकन खाली

४० व्या वर्षापर्यंत घर आणि ऑफिस या सगळ्यात इतके गुंतून जातो की, स्वतःला वेळ देणे अथवा व्यायाम करून स्वतःच्या शरीराला जपणेही कठीण होते. विशेषतः महिलांच्या बाबतीत ही गोष्ट अधिक घडताना दिसते. अनियमित जीवनशैलीमुळे वजन वाढते आणि आत्मविश्वास कमी होऊ लागतो. तसंच वजन वाढल्याने अनेक आजारही निर्माण होतात. पण तुम्ही ४० व्या वर्षानंतरही पोटावरील चरबी कमी करून वजन नियंत्रणात आणू शकता. यासाठी डाएटिशियन सुमन यांनी काही सोप्या टिप्स दिल्या आहेत. (फोटो सौजन्य – iStock)

वजन कमी करण्यासाठी

या घरगुती पेयाच्या सेवनाने कमी करा पोटावरील अतिरिक्त चरबी

फायबरचे सेवन

४० व्या वर्षानंतर वजन कमी करणे अथवा पोटावरील थुलथुलीत चरबी हटविणे आव्हानात्मक असते. अशावेळी डाएटमध्ये फायबरयुक्त पदार्थांचे सेवन करून भूक कमी करता येऊ शकते. फायबर पाणी शोषून घेते आणि पचनक्रिया कमी करते. डाएटमध्ये फायबर सेवनासाठी जव, कडधान्ये, डाळी, फळं आणि भाज्यांचा समावेश करावा. जास्तीत जास्त घरच्या खाण्यावर भर द्यावा. बाहेरचे जंक फूड टाळावे.

प्रोसेस्ड मांसाहार टाळा

प्रोसेस्ड मीट हे शरीरासाठी हानिकारक ठरते. यामध्ये कॅलरीचे प्रमाण अधिक असल्याने पचनक्रिया लवकर होत नाही आणि पोटातील चरबी अधिक वाढू लागते. ती पटकन कमी होत नाही. प्रोसेस्ड मीटच्या नियमित सेवनाने अनेक आजारांचा धोकाही वाढतो. त्यामुळे वजन वाढत असेल आणि पोटाची चरबी कमी होत नसेल तर प्रोसेस्ड मीटचे सेवन बंद करावे.

(वाचा – टाइप – १ आणि टाइप – २ डायबिटीस नियंत्रण एकदम सोपे, सद्गुरूंचे उपाय वापरून १ आठवड्यात पाहा चमत्कार)

फळं आणि भाज्यांचे सेवन

बेली फॅट कमी करण्यासाठी डाएटमध्ये हिरव्या पालेभाज्या आणि फळांचा वा हंगामी फळांचा समावेश करणे अत्यंत गरजेचे आहे. कॅलरी कमी करण्यासह अँटीऑक्सिंड्टचा यामध्ये अधिक समावेश असतो. या पदार्थांच्या सेवनामुळे पोटातील चरबी कमी होते आणि अनेक आजारही दूर राहण्यास मदत मिळते.

(वाचा – फिट राहण्यासाठी शुबमन गिलचा डाएट प्लॅन, नाश्त्यापासून डिनरपर्यंत खातो पॉवरपॅक्ड फूड)

व्यायामाची मदत

पोट कमी करण्यासाठी तुम्ही नियमित व्यायामाची मदत घ्यावी. व्यायामामुळे पोटातील मांस कमी होण्यास अधिक मदत मिळते कारण चरबी जाळण्यात याची महत्त्वपूर्ण भूमिका असते. दिवसभरात कमीत कमी ३० मिनिट्स व्यायाम करावा. व्यायाम नियमित केल्याने हाडं मजबूत होतात आणि वजनही नियंत्रणात राहण्यास मदत मिळते.

(वाचा – स्वादुपिंडाचा कर्करोग अर्थात पॅनक्रिएटिक कॅन्सरची लक्षणे, मृत्यूचा विळखा वाढतोय)

ताणतणाव ठेवा दूर

तणावामुळे कोर्टिसोल हार्मोनचा स्राव जास्त असू शकतो, जो पोटातील चरबी वाढविण्यासाठी हातभार लावतो. त्यामुळे कमीत कमी तणावात तुम्ही राहाल याची काळजी घ्या. उगाच कोणत्याही गोष्टीचा ताण न घेता अथवा सतत विचार न करता तणावाचे योग्य व्यवस्थापन करा. यासाठी नियमित योग, ध्यानधारणा आणि व्यायामाची मदत करा.

झोप महत्त्वाची

​४० व्या वर्षानंतर अनेक आजारांचा धोका वाढतो. त्यामुळे रात्री किमान ७-८ तासांची झोप आवश्यक आहे. कमी झोप झाल्यास, तणाव वाढतो आणि सतत चिडचिड होते. तसंच कमी झोपेमुळेच तणावाच्या कोर्टिसोल हार्मोनचे अधिक निर्माण होते आणि पोट वाढते. त्यामुळे याची काळजी घ्यावी.

टीपः ४० व्या वर्षानंतर तुम्ही या सर्व टिप्सचा वापर करू शकता. मात्र तुम्हाला कोणताही त्रास होत असेल तर आपल्या डॉक्टरांचा सल्ला घेतल्याशिवाय स्वतःहून कोणतेही पाऊल उचलू नका. आम्ही ही केवळ माहिती दिली असून योग्य सल्ला घेऊनच त्याचा वापर करावा.

दिपाली नाफडे यांच्याविषयी

दिपाली नाफडे प्रिन्सिपल डिजीटल कंटेट प्रॉड्युसर

“दिपाली नाफडे प्रिंट, टेलिव्हिजन आणि डिजीटल मीडियामधील मराठी पोर्टल्सचा १५ वर्षांचा अनुभव असून पत्रकार आणि कंटेट रायटर म्हणून कार्यरत. न्यूज आणि नॉन-न्यूज दोन्ही मीडिया क्षेत्रातील कामाचा दांडगा अनुभव असून कोणत्याही विषयावर लिखाणाची जाण ही अनुभवातून आलेली आहे आणि याशिवाय विविध विषयांसंबंधी व्हिडिओदेखील केले आहेत. मनोरंजन, फिचर स्टोरीज, लाइफस्टाईल, ब्युटी, फॅशन, आरोग्य, फूड आणि सेलिब्रेटींची मुलाखत यासंबंधी लिखाण आणि व्हिडिओ दोन्हीमध्ये पारंगत. लोकांना वाचनात गुंतवून ठेवेल आणि माहितीपूर्ण असे लेख लिहिणे यावर नेहमीच भर देण्याचा अँगल. लेख असो अथवा डिजीटल व्हिडिओ असो प्रत्येक गोष्टीत बांधिलकी जपत योग्य आणि महत्त्वपूर्ण माहिती पोहचविण्याची जबाबदारी आणि योग्य दर्जा देत काम केले आहे. टीम लीडर म्हणून जबाबदारी गेल्या ५ वर्षांपासून पेलली असून स्वतःसह टीमचा विकास कसा होईल याकडे अधिक लक्ष पुरविले आहे. व्यावसायिक कामाव्यतिरिक्त मित्रमैत्रिणींसह वेळ घालवायला आणि जेवण बनवायला आवडते.”Read More



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *